ग्रामस्थांकडून श्रमदान करून जिल्हा परिषद केंद्र शाळा वरवली येथे परस बाग उभी केली
१७ नोव्हेंबर २०२५
अधिक वाचा
माझी ग्रामपंचायत माझा अभिमान अंतर्गत माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा सत्कार
१७ ऑक्टोबर २०२५
वरवली गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत आज दि. १७/१०/२०२५ रोजी जिल्हा परिषद शाळेतील गावातली माझी विद्यार्थीना शाळेत बोलावून ग्रामपंचायत वरवली यांच्या वतीने माझी ग्रामपंचायत माझा अभिमान या शिर्षाखाली कार्यक्रम घेण्यात आले असता, त्यावेळी आपल्या गावासाठी, जन्मभूमीसाठी आपले काही देणे लागते म्हणुन माजी विद्यार्थी यांनी काही वस्तू स्वरूपात शाळेसाठी देण्यास मदत करू असेही जाहिर केले. यावेळी माजी सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मानित देखिल केले. या कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, शिक्षण समिती अध्यक्ष, जेष्ठ नागरिक, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष, वरवली गावाचे पोलीस पाटील, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक, इतर शिक्षक कर्मचारी, माजी विध्यार्थी, विध्यार्थीनी तसेच गावातील ग्रामस्थ बहुसंखेने उपस्थित होते.
अधिक वाचा
मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी यांची कार्यशाळा
१५ सप्टेंबर २०२५
मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी यांची कार्यशाळा दि 15/09/2025 रोजी घेण्यात आली. त्यावेळी मार्गदर्शन करताना सरपंच सौ. प्राजक्ता यादव, उपसरपंच रामचंद्र आखाडे, ग्रामपंचायत सदस्य-सदस्या, ग्रामपंचायत अधिकारी विजय निकम, अधिकारी यांनी अधिकारी कर्मचारी यांना सखोल 8 थिम नुसार मार्गदर्शन करून या अभियान बाबत तयारी व कामकाज कसे करावे याचेही नियोजन करून घेतले.
अधिक वाचा