मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत तालुकास्तरीय तपासणी
१३ मे २०२६
आज बुधवार दिनांक 13 मे 2026 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत तालुकास्तरीय तपासणी जिल्हा परिषद नाशिक तालुका इगतपुरी येथील गट विकास अधिकारी मा. श्री. महेश वळवी साहेब, मा. श्री. रविंद्र आहिरे सर विस्तार अधिकारी पंचायत, ज्ञानेश्वर कराळे सर विस्तार अधिकारी पंचायत या टीम ने ग्रामपंचायत वरवली, ता. खेड, जि. रत्नागिरी ची गुणांकना नुसार तपासणी केली. यावेळी ग्रामपंचायत प्रशासक सौ. प्राजक्ता दिपक यादव, ग्रामपंचायत सदस्य श्री संतोष यादव, श्री बाळकृष्ण पवार, श्रीमती कमलताई पड्याळ, सौ.स्वप्नाली यादव, सौ. वैशाली जाधव तसेच ग्रामपंचायत अधिकारी विजय निकम, सोमजाई ग्राम संघाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सी आर पी, सौ अंजली यादव, ग्रामपंचायत अधिकारी युनियन खेडचे अध्यक्ष श्री. रोहन क्षीरसागर व सदस्य , अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका, जिल्हा परिषद केंद्र शाळा वरवली चे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री अमित सावंत सर, मुख्याध्यापक श्री भागोजी कडव सर तसेच इतर शिक्षक वृंद, आरोग्य सेवक सेविका व आरोग्य कर्मचारी, बचत गटाचे तालुकास्तरीय अधिकारी श्री मर्चंडे साहेब व श्रीमती रूपाली कोळंबे मॅडम, वरवली गावचे महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री अनिल यादव, वरवली गावचे पोलीस पाटील श्री गणेश आखाडे तसेच बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. त्यावेळी ग्रामपंचायत वरवली ने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कालावधीत केलेल्या कामांचे भरभरून कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अधिक वाचा
ग्रामपंचायत वरवली येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातील कामांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी
३० जानेवारी २०२६
शुक्रवार, दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी ग्रामपंचायत वरवली येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांची पाहणी व तपासणी करण्यात आली. यासाठी जिल्हा परिषद रत्नागिरीच्या मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे यांनी विशेष भेट दिली.
यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री सागर पाटील पंचायत समिती खेडचे गटविकास अधिकारी श्री गणेश मंडलिक सहाय्यक गटविकास अधिकारी श्री विजय करपे पंचायत समिती खेडचे विस्तार अधिकारी श्री विकास देसाई तसेच कृषी विस्तार अधिकारी श्री गावडे व श्री लोहार तसेच अंगणवाडी सेविका,मदतनीस, आशा सेविका, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत वरवली अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या कालावधीत करण्यात आलेल्या विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच संबंधित दप्तर, नोंदी व प्रशासकीय कागदपत्रांची सखोल तपासणी करण्यात आली.
या पाहणीप्रसंगी ग्रामपंचायत वरवलीच्या सरपंच माननीय श्रीमती प्राजक्ता यादव, उपसरपंच माननीय श्री रामचंद्र आखाडे, ग्रामपंचायत सदस्य श्री संतोष यादव, श्री बाळकृष्ण पवार, श्रीमती कमलताई पड्याळ, श्रीमती स्वप्नाली यादव, श्रीमती वैशाली जाधव उपस्थित होते. तसेच सोमजाई ग्राम संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सी.आर.पी., ग्रामपंचायत वरवलीचे ग्रामपंचायत अधिकारी श्री विजय निकम आणि बहुसंख्येने ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत वरवलीने अभियानाअंतर्गत राबविलेल्या विकासकामांचे, नियोजनाचे व अंमलबजावणीचे भरभरून कौतुक केले. ग्रामपंचायतीने पारदर्शक प्रशासन, लोकसहभाग आणि नियोजनबद्ध विकास साधल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. तसेच पुढील काळात अधिक दर्जेदार व लोकाभिमुख कामे करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनास शुभेच्छा देण्यात आल्या.
या पाहणीमुळे ग्रामपंचायत वरवलीच्या विकासकामांना अधिक गती मिळणार असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ही भेट प्रेरणादायी ठरल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
ग्रामपंचायत वरवली कडून बचत गटातील महिलांना व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण
१० जानेवारी २०२६
ग्रामपंचायत वरवली कडून शनिवारी दिनांक १०/०१/२०२६ रोजी बचत गटातील महिलांना व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले.
अधिक वाचा
ग्रामपंचायत वरवली, त.खेड कडून महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण
०२ जानेवारी २०२६
ग्रामपंचायत वरवली, त.खेड कडून महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण
अधिक वाचा
आदिशक्ती अभियाना अंतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
३० डिसेंबर २०२५
आदिशक्ती अभियाना अंतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्या बद्दल... जि प शाळा वरवली -1 कडून सर्वांचे खूप खूप आभार..... 💐💐🙏🙏
अधिक वाचा
आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी गावातील सार्वजनिक स्थळांची स्वच्छता
२१ डिसेंबर २०२५
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी सकाळी गावातील सर्व ग्रामस्थ, युवक युवती, आणि महिला ग्रामसंघ, शेतकरी गट सर्व मिळून गावातील सार्वजनिक ठिकाण रस्ते, पायवाटा, सार्वजनिक कार्यालय, शाळा, अंगणवाडी ग्रामपंचायत कार्यालय, स्मशान भूमी तसेच सर्व धार्मिक स्थळांची स्वच्छता करण्यात येते
अधिक वाचा
गावातील परिसर स्वच्छ करण्यासाठी मोठ्या संखेने महिलांनी घेतला सक्रिय सहभाग
१९ डिसेंबर २०२५
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत सुरू असलेल्या प्रत्येक उपक्रमात वरवली गावातील महिलांनी सक्रिय सहभागी होऊन अभियान यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आज दिनांक 19,20,21 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा परिषद केंद्र शाळा वरवली, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय तसेच गावातील सार्वजनिक रस्ते,पायवाटा, गावातील सर्व धार्मिक स्थळे तसेच स्वतःच्या घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यासाठी मोठ्या संखेने महिलांनी सक्रिय सहभाग घेतला.
अधिक वाचा
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत रक्तगट तपासणी शिबिर
०३ डिसेंबर २०२५
ग्रामपंचायत वरवली यांजकडून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत रक्तगट तपासणी शिबिर बुधवार दिनांक 03 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वरवली येथे ग्रामपंचायत वरवली कडून आयोजित करण्यात आले. सदर शिबिर यशस्वी होण्यासाठी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य /सदस्या, गावातील सर्व ग्रामस्थ, सर्व मुलं - मुली, तरुण युवक युवती, सर्व अबाल वृद्ध, सर्व शासकीय निमशासकीय अधिकारी/ कर्मचारी , आरोग्य यंत्रणा या मध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेवीका तसेच महिला ग्रामसंघ, महिला बचत गट, महिला मंडळ, शेतकरी, शेतकरी गट या सर्वांनी रक्तगट तपासणी व हिमोग्लोबीन तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले व ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .
अधिक वाचा
ग्रामपंचायत वरवली येथे लोक सहभागातून तीन बंधारे बांधण्यात आले
०१ डिसेंबर २०२५
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत वरवली येथे लोक सहभागातून तीन विजय बंधारा बांधण्यात आले त्यावेळीं वरवली गावच्या सरपंच सौ. प्राजक्ता दिपक यादव, ग्रामपंचायत सदस्य श्री. संतोष धोंडू यादव, सौ. स्वप्नाली मनोहर यादव, श्रीम. कमल रामचंद्र पड्याळ, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका मदतनीस, महिला ग्रामसंघ अध्यक्ष, CRP, बचत गटातील महिला, ग्रामस्थ व महिला, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी श्री. विजय आत्माराम निकम उपस्थित होते. सदर ठिकानी बंधारे बांधून पाण्याचा साठा वाढविण्यात आले.
अधिक वाचा
ग्रामपंचायत वरवली गावाचे खेड पंचायत समिती येथे वेबसाईटचे सादरीकरण
२४ नोव्हेंबर २०२५
ग्रामपंचायत वरवली गावाचे खेड पंचायत समिती येथे वेबसाईट www.gpvaravali.in चे सादरीकरण आढावा सभेत सकाळी मा. श्रीम. वैदेही मनोज रानडे मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. रत्नागिरी व मा. श्री. परीक्षित यादव साहेब अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. रत्नागिरी यांचे सत्रात सादरीकरण करण्यात आले व या मधील बाबीची प्रात्यक्षिक घेऊन सत्यता देखील पडताळणी करण्यात आले तदनंतर Excellnt work केले असून कौतुकाची थाप दिली. व या सभेत श्री. विजय आत्माराम निकम ग्रामपंचायत अधिकारी यांचे कौतुक करण्यात येऊन त्यांनी स्वयंम प्रेरणेने गावाचे www.gpvaravali.in सुंदर असे संकेतस्थळ तयार केले यामुळे वरवली डिजिटल गाव म्हणुन ओळख निर्माण करून पहिले पाऊल उचलले आहे. तसेच पंचायत समिती खेड चे गटविकास अधिकारी मा. श्री. गणेश मंडलिक साहेब व सहा. गटविकास अधिकारी मा. श्री. विजय करपे साहेब यांचे या वेबसाईटसाठी मोलाचे सहकार्य लाभले.
अधिक वाचा
ग्रामपंचायतीच्या वतीने 15 वा वित्त आयोग योजनेतून सतरंजीचे वाटप
२० नोव्हेंबर २०२५
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत आज दि 20/11/2025 रोजी वरवली गावातील एक महिला ग्रामसंघ व आकार महिलांना बचत गटांना ग्रामपंचायतीच्या वतीने 15 वा वित्त आयोग योजनेतून सतरंजीचे वाटप करण्यात आले. व महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळी सरपंच प्राजक्ता यादव, उपसरपंच रामचंद्र आखाडे, ग्रामपंचायत सदस्य सदस्या व ग्रामपंचायत अधिकारी यांनी मार्गदर्शन केले व उपस्थित महिलांचा गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले त्यावेळी सर्व पदाधिकारी महिला शासकीय कर्मचारी ग्रामपंचायतीला उपस्थित होते.
अधिक वाचा
ग्रामपंचायत वरवली यांजकडून आयुष्मान भारत गोल्डन कार्ड कॅम्प
२० नोव्हेंबर २०२५
ग्रामपंचायत वरवली यांजकडून आयुष्मान भारत गोल्डन कार्ड कॅम्प गुरुवार दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी ग्रामपंचायत वरवली कडून आयोजित करण्यात आला. सदर कॅम्प यशस्वी होण्यासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य व आरोग्य सेवक/सेविका, आशा सेविका, गावातील ग्रामस्तरीय मंडळ, युवक/युवती यांनी श्री मारुती मंदिर वरवली धुपेवाडी येथे उपस्थित राहून ज्या ग्रामस्थांचे आयुष्मान गोल्डन कार्ड काढणे बाकी होते त्या ग्रामस्थांनी सदर शिबिरात येऊन गोल्डन कार्ड काढून घेतले.
अधिक वाचा