Emblem

निर्मल ग्रामपंचायत वरवली

तालुका - खेड, जिल्हा - रत्नागिरी, महाराष्ट्र

Nirmal Grampanchayat Varvali

Maharashtra-Emblem Azaadi-Ka-Amrut-Mahostav Punyashlok_300_Logo Grampanchayat-Varwali
:

परिचय

सह्याद्री पर्वत रांगांमध्ये वनराई ने समृद्ध असलेले सुंदर निर्मल तंटामुक्त वरवली हे गाव वसलेले आहे. गावाच्या भौगोलिक सीमा या तीन बाजूंनी नद्या तर एका बाजूने सह्याद्री पर्वताची डोंगररांग आहे. ही डोंगर रांग गावाची उत्तर सीमेबरोबरच रत्नागिरीव सातारा जिल्ह्याची भौगोलिक सीमा निश्चित करतेयाच डोंगर रांगांमध्ये जगबुडी, जांबु या नद्यांची उगमस्थाने आहेत.पूर्वेला असलेला सह्याद्री डोंगरावर प्रसिद्ध असे जागृत श्री शंकर महादेवाचे चकदेव देवस्थान आहे. खूप सारे भाविक भक्त श्रावण महिन्यात या देवस्थानला भेट देतात. तसेचवळवण हे सातारा जिल्ह्यातील गाव वरवली च्या पूर्व सीमेला आहे.

वरवली गावाची उत्तर सीमारांजणइरा या प्रवाहाने निश्चित केली असून सनगर हे गाव उत्तर सीमेलगत आहे. दक्षिणेला आंबवली हे खेड तालुक्याच्या दक्षिणेकडील एक मध्यवर्ती ठिकाण असलेले गाव आहे. येथे बँका, पोस्ट ऑफिसव आरोग्य उपकेंद्राच्या सुविधा मिळतात. वरवली व आंबवलीगावाचे भौगोलिक सीमा ही जांभू नदीने विभागली आहे

कोकणातीलमहत्त्वाचे असलेले जगबुडी नदी ही वरवली गावाचीपश्चिम सीमा निश्चित करते व नदीच्या पलीकडे वरची हुंबरी हे गाव आहे.

Nirmal Gram Award Image

ग्रामपंचायत वरवली स्थापना दिनांक : १६ ऑक्टोबर १९६९

सुरुवातीच्या काळात ग्रुप ग्रामपंचायत आंबवली अंतर्गत वरवली व आंबवली ही दोन्ही गावे समाविष्ट होती. त्यानंतर गुरुवार, दिनांक १६ ऑक्टोबर १९६९ रोजी वरवली गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात आली. या ग्रामपंचायतीचे प्रथम सरपंच म्हणून कै. यादव यांची निवड झाली, तसेच ग्रामसेवक म्हणून ____ यांची नियुक्ती करण्यात आली.

त्या काळातील परिस्थिती अत्यंत कठीण असूनही कै. सरपंच यादव व इतर सदस्यांनी अपार कष्ट, चिकाटी आणि दूरदृष्टीच्या जोरावर गावाच्या विकासाचा पाया भक्कम केला. गावात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच विविध विकासकामांना चालना देण्यासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. त्यांच्या कार्याचा आदर्श पुढील सर्व सरपंचांनी जपला आणि गावाच्या सर्वांगीण विकासाला सातत्याने प्राधान्य दिले. त्याच परिश्रमांचे फलित म्हणून सन २००६–२००७ या कालावधीत सरपंच श्री. धोंडू बाबू यादव यांच्या कार्यकाळात वरवली गावाला तत्कालीन राष्ट्रपती मा. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या शुभहस्ते ‘निर्मल ग्राम पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

वरवली गावातील वाड्या

कुदळवाडी
धुपेवाडी
सुतारवाडी
देऊळवाडी
रोहिदासवाडी
बौद्धवाडी
गावठाण वाडी
धनगरवाडी

गावातील धार्मिक पर्यटन

धुपेवाडी

समर्थ हनुमान मंदिर धुपे वाडी मधील एक सामाजिक धार्मिक घडामोडीचे ठिकाण असून येथील सभा मंडपात अबलवृद्धाची सततची बसण्याची,खेळण्याची बागडायची जागा आहे.

सोमजाई मंदिर (धुपेवाडी)

ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्याने पुढे गेल्यास सोमजाई मातेचे मंदिर आहे. या मंदिरात नवरात्र उत्सवात मुंबई पुण्याला गेलेले कोकणवासी आवर्जून दर्शनासाठी येतात एक जागृत असे देवस्थान आहे.

गावठाणवाडी

सोमजाई हनुमान मंदिर व शंकर मंदिर.

शिमगा उत्सवात सोमजाई मातेची पालखी संपूर्ण गावात थाटात उत्साहात फिरवली जाते.

देऊळवाडी

सोमजाई-हनुमान मंदिर

s
Emblem

निर्मल ग्रामपंचायत वरवली

Loading...

कृपया प्रतीक्षा करा...