महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
जॉबकार्ड (Job card) काढण्यासाठी पात्रता:
- ग्रामीण भागातील रहिवाशी असावा.
- वय वर्ष १८ पासून पुढे असावा.
- अंगमेहनतीचे काम करण्याची तयारी असावी.
जॉबकार्ड काढण्याची पद्धत :
संबंधित मजुराने खालील कागदपत्रे त्याच्या ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक किंवा ग्रामरोजगार सेवक यांच्याकडे द्यावी.
- कुटुंब नोंदणीसाठी करावयाचा अर्ज नमुना नंबर १ (ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध आहे) Click to download
- गावातील रहिवाशी असल्याचा पुरावा (रेशनकार्ड zerox, आधारकार्ड zerox, इतर कोणताही पुरावा)
- बँक पासबुक zerox
- कुटुंबाचा एकत्रित ४*६ चे ३ फोटो
- काम मागणीचा अर्ज नमुना क्र. ४ भरून देणे Click to download
- जॉबकार्ड details.
Nrega अंतर्गत घेता येणारी वैयक्तिक कामे मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- विहित नमुन्यात अर्ज
- जॉबकार्ड details
- संबंधित कामासाठी लागणारी सर्व कागदपत्रे
- ग्रामसभेची मान्यता.
मजुरी अदा करण्याची पद्धत :
संबंधित मजुराने जॉबकार्ड काढताना किंवा E-musters काढताना जे बँक पासबुक zerox दिलेले असेल त्यात किंवा आधार लिंक केलेला असल्यास आधार बेस पेमेंट द्वारे बँक मध्ये E-musters चा कालावधी संपल्यावर ८ दिवसात मजुरी थेट खात्यात जमा होईल. वैयक्तिक कामांबाबत कुशलचे पेमेंट (उदा. फळबाग लागवड मध्ये रोपे खरेदी, पिशव्या खरेदी, खते ई. साहित्य) हे देखील थेट त्याच खात्यात जमा होते. सार्वजनिक कामांचे कुशलचे पेमेंट हे संबंधित यंत्रणेच्या खात्यात जमा होऊन नंतर संबंधिताना देण्यात येते. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरिता मनरेगा ची मजुरी रक्कम रु. २४८ /- प्रतिदिन आहे.
अनुज्ञेय कामे :
मनरेगा अंतर्गत घेता येणाऱ्या २६२ कामांपैकी रत्नागिरी जिल्ह्याची भौगोलिक परिस्तिथी लक्षात घेता खालील कामे प्रामुख्याने घेता येऊ शकतात.
वैयक्तिक स्वरुपाची कामे :
- प्रधानमंत्री आवास योजना/इंदिरा आवास योजना अंतर्गत घरकुलचे अकुशल काम
- फळबाग लागवड
- वृक्षलागवड (पडीक जमिनीवर /रस्ता दुतर्फा /किनारपट्टी लगत /बांधावर इ.)
- सिंचन विहीर
- शेततळे
- शोषखड्डे
- कंपोस्ट खत/नाडेफ खत/गांडूळ खत टाकी
- अझोला खत/ जैविक खत निर्मित साचा
- गुरांचा/ शेळीचा गोठा
- कुक्कुटपालन शेड
- शेत बांध बंदिस्ती
- सार्वजनिक फळबाग लागवड
- सार्वजनिक वृक्षलागवड (पडीक जमिनीवर /रस्ता दुतर्फा /किनारपट्टी लगत /बांधावर इ.)
- रोपवाटिका
- सार्वजनिक सिंचन विहीर
- शेततळे
- CCT
- सार्वजनिक कालवा/ तळे/ लहान पाझर तलाव/ मत्सपालन तलाव बांधणे, दुरुस्ती व नूतनीकरण
- गुरांचा/ शेळीचा गोठा /कुक्कुटपालन शेड
- रस्ते
राज्य अभिसरण आराखड्यामध्ये अकुशल भाग हा रोजगार हमी योजना मधून व कुशल भाग इतर योजना मधून दिला जातो. यामध्ये एकूण २८ कामांपैकी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घेता येऊ शकणारी कामे खालीलप्रमाणे आहेत. View GR
- शाळेसाठी संरक्षण भिंत बांधकाम
- शाळेकरिता/मैदानाकरिता साखळी कुंपण
- शालेय स्वयंपाकगृह निवारा
- अंगणवाडी बांधकाम
- ग्रामपंचायत भवन
- सार्वजनिक जागेवर गोदाम
- स्मशानभूमी शेड बांधकाम
- बचत गटांच्या जनावरांसाठी सामुहिक गोठे
- छतासह बाजार ओटा/ मासे सुकवण्यासाठी व विक्रीसाठी ओटा
- सामुहिक मत्स्यतळे
- सिमेंट रस्ता
- डांबर रस्ता
- पेव्हिंग block रस्ता
- नाला मोरी बांधकाम
- सिमेंट नाला बांध
- RCC मुख्य निचरा प्रणाली
- भूमिगत बंधारा
- विहित नमुन्यात अर्ज .(गटविकास यांच्या नावे )
- मागणी पत्र (ग्रामसेवक /सरपंचाच्या नावे)
- ग्रामपंचायत ग्रामसभेचा ठराव प्रत
- जॉबकार्ड असलेबाबतचा दाखला (ग्रामसेवकांचा)
- बँक पासबुक / पोस्ट बुक खाते तपशिल.
- आधारकार्ड झेरॉक्स.
- ७/१२ व ८ अ
- क्षेत्र २ हे. पेक्षा कामे असावे व त्याच क्षेत्रावर यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- ७/१२ वर सह-हिस्सेदार असल्यास त्यांचे समंतीपत्र व स्वतःच्या क्षेत्रात लागवड करीत असल्याचे क्षत्रीपुर्ती बंधपत
- विहित नमुन्यात अर्ज .(गटविकास यांच्या नावे )
- मागणी पत्र (ग्रामसेवक /सरपंचाच्या नावे)
- ग्रामपंचायत ग्रामसभेचा ठराव प्रत
- जॉबकार्ड असलेबाबतचा दाखला (ग्रामसेवकांचा)
- बँक पासबुक / पोस्ट बुक खाते तपशिल.
- आधारकार्ड झेरॉक्स.
- कोंबड्या नसल्यास बांधकाम झाल्यानंतर १ महिन्यात कोंबड्या घेण्याचा करारनामा (प्रतिज्ञापत्र) (100रु.बाँडपेपरवर).
- कुक्कुटपालन शेडचा असेटमेंट उतारा, मात्र सदर असेसमेंट उताऱ्यावर अन्य हिस्सेदार
- असल्यास त्यांचे संमत्तीपत्र मा.तहसिलदारसाहेब समोर (100 रु.बाँडपेपरवर)
- (कुक्कुटपालन शेडचा असेसमेंट उतारा नसल्यास )
- जागेचा 7/12 उतारा व 8 अ , मात्र 7/12 उताऱ्यात अन्य हिस्सेदार असल्यास सर्व हिस्सेदारांचे
- मा.तहसिलदार यांचे समोर संमत्तीपत्र ( 100 रु.बाँडपेपरवर )आवश्यक.
- हमीपत्र, मागणी पत्र
- 100 पक्षी (कोबडया) असल्याबाबतचा पशुधन विभागाचा दाखला
- विहित नमुन्यात अर्ज .(गटविकास यांच्या नावे )
- मागणी पत्र (ग्रामसेवक /सरपंचाच्या नावे)
- ग्रामपंचायत ग्रामसभेचा ठराव प्रत
- जॉबकार्ड असलेबाबतचा दाखला (ग्रामसेवकांचा)
- बँक पासबुक / पोस्ट बुक खाते तपशिल.
- आधारकार्ड झेरॉक्स .
- करारनामा (प्रतिज्ञापत्र) (100रु.स्टॅम्पवर).
- गोठयाचा असेटमेंट उतारा, मात्र सदर असेसमेंट उताऱ्यावर अन्य हिस्सेदार
- असल्यास त्याचे संमत्तीपत्र मा.तहसिलदारसाहेब समोर (100 रु.बाँडपेपरवर)
- (गोठयाचा असेसमेंट उतारा नसल्यास )
- जागेचा 7/12 उतारा व 8अ , मात्र 7/12 उताऱ्यात अन्य हिस्सेदार असल्यास
- सर्व हिस्सेदारांचे मा.तहसिलदार यांचे समोर संमत्तीपत्र ( 100 रु.बाँडपेपरवर )आवश्यक.
- हमीपत्र, मागणी पत्र
- दुसऱ्या लाभासाठी १२ जनावरे व तिसऱ्या लाभासाठी १८ जनावरे असल्याबाबतचा पशुधन विभागाचा दाखला
- विहित नमुन्यात अर्ज .(गटविकास यांच्या नावे )
- मागणी पत्र (ग्रामसेवक /सरपंचाच्या नावे)
- ग्रामपंचायत ग्रामसभेचा ठराव प्रत
- जॉबकार्ड असलेबाबतचा दाखला (ग्रामसेवकांचा)
- बँक पासबुक / पोस्ट बुक खाते तपशिल.
- आधारकार्ड झेरॉक्स .
- करारनामा (प्रतिज्ञापत्र) (100रु.बाँडपेपरवर).
- शेळीपालन शेड असेटमेंट उतारा, मात्र सदर असेसमेंट उताऱ्यावर अन्य हिस्सेदार
- असल्यास त्याचे संमत्तीपत्र मा.तहसिलदारसाहेब समोर (100 रु.बाँडपेपरवर)
- (शेळीपालन शेडचा असेसमेंट उतारा नसल्यास )
- जागेचा 7/12 उतारा व 8 अ , मात्र 7/12 उताऱ्यात अन्य हिस्सेदार असल्यास
- सर्व हिस्सेदारांचे मा.तहसिलदार यांचे समोर संमत्तीपत्र ( 100 रु.बाँडपेपरवर )आवश्यक.
- हमीपत्र, मागणी पत्र
- दुसऱ्या लाभासाठी २० शेळ्या व तिसऱ्या लाभासाठी ३० शेळ्या असल्याबाबतचा पशुधन विभागाचा दाखला
- लाभाथ्याचे जॉबकार्ड आवश्यक.
- ग्रामसभेचा ठराव आवश्यक
- किमान 0.60 गुठे सलग क्षेत्र आवश्यक ,सदर क्षेत्राचा 7/12 उतारा व 8 अ आवश्यक.
- प्रस्तावित विहिरीपासुन 500 फुटाच्या आत दुसरी विहिर नसलेबाबतचा तलाठी /ग्रामसेवक यांचा दाखला
- 7/12 उताऱ्यात अन्य हिस्सेदार असल्यास मा. तहसिलदार साहेब यांच्या समोर सर्व हिस्सेदारांचे संमत्तीपत्र आवश्यक
किंवा
समूह सिंचन विहिर प्रस्ताव प्रकरण करावयाचे असल्यास 7/12 उतारामधील सर्व हिस्सेदारांचे मा. तहसिलदार साहेब यांचे समोर संमत्तीपत्र (100 रु.बाँडपेपरवर ) व सर्वांचे पाणी वाटप करारपत्र मा.सरपंच यांचे समोर आवश्यक (100 रु बाँडपेपरवर) . - प्रस्तावित विहिरीच्या ठिकाणी पाणी उपलब्ध असलेबाबतचा भुजल सर्वेक्षण विभागाचा दाखला आवश्यक.( प्रस्ताव सादर केल्यानंतर सदर दाखल्याची मागणी पं.स.मार्फत केली जाईल.)
- विहित नमुन्यात अर्ज .(गटविकास यांच्या नावे )
- मागणी पत्र (ग्रामसेवक /सरपंचाच्या नावे)
- ग्रामपंचायत ग्रामसभेचा ठराव प्रत
- लाभार्थ्याच्या घरपत्रकाचा उतारा.(जर लाभार्थीचे नाव घरपत्रकावर नसल्यास संबधितांकडुन मा.सरपंच याचंे समोर साधे संमत्तीपत्र )
- जॉबकार्ड असलेबाबतचा दाखला (ग्रामसेवकांचा)
- बँक पासबुक / पोस्ट बुक खाते तपशिल.
- ओळखपत्र / रेशनकार्ड / आधारकार्ड झेरॉक्स .
- विहित नमुन्यात अर्ज .(गटविकास यांच्या नावे )
- मागणी पत्र (ग्रामसेवक /सरपंचाच्या नावे)
- ग्रामपंचायत ग्रामसभेचा ठराव प्रत
- जॉबकार्ड असलेबाबतचा दाखला (ग्रामसेवकांचा)
- ज्या जागेत गांडुळ खत /नॅडेप खत तयार करावयाचे आहे त्या जागेचा 7/12 उतारा
- नोव्हेंबर 2005 नंतर तिसरे अपत्य नसल्याबाबत व कुटंब मर्यादीत असलेबाबतचा
- ग्रामसेवक/सरपंच यांचा दाखला.
- जागा पुरेशी असलेबाबत ग्रामसेवक यांचा दाखला.
- बँक पासबुक/पोस्टबुक खाते तपशिल.
- आधारकार्ड झेरॉक्स.
- विहित नमुन्यात अर्ज .(गटविकास यांच्या नावे )
- मागणी पत्र (ग्रामसेवक /सरपंचाच्या नावे)
- ग्रामपंचायत ग्रामसभेचा ठराव
- नमुना नंबर २६
- विहित नमुन्यात अर्ज .(गटविकास यांच्या नावे )
- मागणी पत्र (ग्रामसेवक /सरपंचाच्या नावे)
- जॉबकार्ड असलेबाबतचा दाखला (ग्रामसेवकांचा)
- ग्रामपंचायत ग्रामसभेचा ठराव प्रत
- ७/१२ (विहिरीची नोंद आवश्यक)
- मागील ३ वर्षात गाळ न काढल्याचा दाखला