परिचय
वरवली हे एक शांत व निसर्गरम्य गाव असून, गावात सामाजिक, शैक्षणिक आणि प्रशासनिक दृष्टीने अनेक प्रगतीशील उपक्रम राबवले जातात. ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा आणि विविध विकास प्रकल्पांमुळे गावाची ओळख एक सुशिक्षित आणि संघटित समाजरचना म्हणून झाली आहे.
या वेबसाइटच्या माध्यमातून गावातील नागरिकांना महत्वाच्या सूचना, फोटो गॅलरी, तसेच विविध योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळवता येईल, ही आमची अपेक्षा आहे.
मुख्यमंत्री
मा. श्री. देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री
मा. श्री. एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री
श्रीम. सुनेत्रा अजित पवार
मंत्री, ग्रामविकास व
पंचायतराज विभाग
मा. श्री. जयकुमार गोरे
माननीय राज्यमंत्री, ग्रामविकास व
पंचायतराज विभाग
मा. श्री. योगेश कदम
प्रधान सचिव, ग्रामविकास व
पंचायतराज विभाग
मा. श्री. एकनाथ डवले
मुख्य कार्यकारी अधिकारी
मा. श्रीम. वैदेही मनोज रानडे (भा.प्र.से.)
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
मा. श्री. परिक्षीत यादव
माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.)
मा. श्री. सागर पाटील
गटविकास अधिकारी
मा. श्री. गणेश मंडलिक
सहा. गटविकास अधिकारी
मा. श्री. विजय करपे
विस्तार अधिकारी
मा. श्री. नाथा जमादार पाटील
ग्रामपंचायत अधिकारी
मा. श्री. विजय आत्माराम निकम
ग्राम वरवली - माहिती
ग्रामपंचायत क्षेत्रफळ
६२२.३५ हेक्टर आर
जिल्हा परिषद ते ग्रामपंचायत अंतर
१४० किमी
गावाची लोकसंख्या
७४२
(२०११ च्या जनगणनेनुसार)
एकूण वाड्या
०८
प्राथमिक शाळा
०१
अंगणवाडी
०१
एकूण वॉर्ड्स
०३
एकूण धार्मिक स्थळ
०६
ग्रामपंचायतीमधील सर्वसाधारण सुविधा
ग्रामपंचायतीच्या चालू घडामोडी
ग्रामपंचायत वरवली येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातील कामांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी
ग्रामपंचायत वरवली येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातील कामांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी
शुक्रवार, दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी ग्रामपंचायत वरवली येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांची पाहणी व तपासणी करण्यात आली. यासाठी जिल्हा परिषद रत्नागिरीच्या मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे यांनी विशेष भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री सागर पाटील पंचायत समिती खेडचे गटविकास अधिकारी श्री गणेश मंडलिक सहाय्यक गटविकास अधिकारी श्री विजय करपे पंचायत समिती खेडचे विस्तार अधिकारी श्री विकास देसाई तसेच कृषी विस्तार अधिकारी श्री गावडे व श्री लोहार तसेच अंगणवाडी सेविका,मदतनीस, आशा सेविका, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत वरवली अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या कालावधीत करण्यात आलेल्या विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच संबंधित दप्तर, नोंदी व प्रशासकीय कागदपत्रांची सखोल तपासणी करण्यात आली. या पाहणीप्रसंगी ग्रामपंचायत वरवलीच्या सरपंच माननीय श्रीमती प्राजक्ता यादव, उपसरपंच माननीय श्री रामचंद्र आखाडे, ग्रामपंचायत सदस्य श्री संतोष यादव, श्री बाळकृष्ण पवार, श्रीमती कमलताई पड्याळ, श्रीमती स्वप्नाली यादव, श्रीमती वैशाली जाधव उपस्थित होते. तसेच सोमजाई ग्राम संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सी.आर.पी., ग्रामपंचायत वरवलीचे ग्रामपंचायत अधिकारी श्री विजय निकम आणि बहुसंख्येने ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत वरवलीने अभियानाअंतर्गत राबविलेल्या विकासकामांचे, नियोजनाचे व अंमलबजावणीचे भरभरून कौतुक केले. ग्रामपंचायतीने पारदर्शक प्रशासन, लोकसहभाग आणि नियोजनबद्ध विकास साधल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. तसेच पुढील काळात अधिक दर्जेदार व लोकाभिमुख कामे करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनास शुभेच्छा देण्यात आल्या. या पाहणीमुळे ग्रामपंचायत वरवलीच्या विकासकामांना अधिक गती मिळणार असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ही भेट प्रेरणादायी ठरल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
30 January 2026
ग्रामपंचायत वरवली कडून बचत गटातील महिलांना व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण
ग्रामपंचायत वरवली कडून शनिवारी दिनांक १०/०१/२०२६ रोजी बचत गटातील महिलांना व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले.
१० जानेवारी २०२६
ग्रामपंचायत वरवली, त.खेड कडून महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण
ग्रामपंचायत वरवली, त.खेड कडून महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण
०२ जानेवारी २०२६
आदिशक्ती अभियाना अंतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
आदिशक्ती अभियाना अंतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्या बद्दल... जि प शाळा वरवली -1 कडून सर्वांचे खूप खूप आभार..... 💐💐🙏🙏
३० डिसेंबर २०२५